सत्ताधारी हे प्रशासनावर वचक ठेवू शकत नसेल तर राजीनामे द्यावे #chandrapur #Korpana

Bhairav Diwase
0

प्रहार चे बिडकर यांनी व्यक्त केले मत


कोरपना:- गडचांदूर शहरात विकास कुठे आहे. हे दिसेनासे झालेले आहे, अनेक समस्यांना तोंड देत गडचांदूर शहर हे विकासात नसून भकासात गिनले जात आहे याची प्रचिती आज गडचांदूरकरांनी आली.


नगरपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे महत्त्वाचे होते, परंतु नगरपंचायत यांच्या भोंगळ कारभारामुळे नालीसफाई झाली नाही व आज पावसाळ्यातला पहिला पाऊस पडला त्या पावसामुळे नालीची सर्व घाण कचरा हा रस्त्यावर वाहत येऊन पडला तर काही ठिकाणी लोकांच्या घरात सुद्धा नालीचे घाण पाणी गेले याला कारणीभूत नगरपरिषद चे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी अधिकारी हे सुद्धा आहे.

सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर वचक ठेवले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती पण, सत्ताधारांना नगरपंचायत प्रशासनावर वचक ठेवता येत नसेल तर त्यांनी स्वखुशीने राजीनामे द्यायला पाहिजे, असे मत प्रहारचे बिडकर यांनी मांडले. अनेक ठिकाणी होणाऱ्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. याला नगरसेवक उत्तर देत नाही. अशी चर्चा सुजाण नागरिकांना मध्ये सुध्दा सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)