रमेश राजूरकर यांचा भाजपात अधिकृत प्रवेश #chandrapur

चंद्रपूर:- वरोरा विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागील विधानसभेचे उमेदवार रमेश राजूरकर हे रविवार, २५ जून रोजी भद्रावती येथील जैन मंदिराच्या सभागृहात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. बंटी भांगडिया, आ. संजीव रेड्डी बोदकुवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते बळवंतराव गुंडावार, विजय राऊत, अफझलभाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, तालुका अध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, महामंत्री नरेंद्र जीवतोडे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, शहर महामंत्री किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.  

सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविताना अनेक अडचणी येतात. समाजकार्य करताना या अडचणी सोडविण्यासाठी राजकारणाची जोड असणे आवश्यक असल्याचा आपल्याला अनुभव आला आहे. सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर आपला भर आहे. विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नसल्याने आपण पक्ष प्रवेश करणार असल्याचे राजूरकर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा सांभाळल्यानंतर देशाला ज्या पद्धतीने प्रगतिपथावर आणले, त्यांच्या या कार्याने आपण प्रभावित झालो असून, राज्य तसेच जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या