रामपूर शिवसेनेच्या वतीने सामाजिक कार्य संपन्न.

रामपूर शिवसेनेच्या वतीने सामाजिक कार्य संपन्न.

वॉर्ड क्र 3 मधील कचऱ्याच्या विडख्यात असलेला परिसर जेसीबी च्या साहाय्याने केला साफ

राजुरा:- रामपूर येथे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आणि कार्य चालू आहे.
नुकतेच शिवसेना नेते बबन उकरुडे यांच्या वाढदिवसानिमित्य गुरुदेव सेवा मंडळ प्रतिष्ठान समोर शेडच्या कामाचे भूमिपूजन पार पाडले असताना आज वॉर्ड क्र 3 मधील कचऱ्याच्या विडख्यात असलेल्या परिसराला जेसीबी च्या साहाय्याने साफ करण्यात आले.


शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे यांचेकडे परिसरातील नागरिकांची वारंवार तक्रार येत होती. त्यांनी आपल्या स्व: खरचातून ते काम पुर्ण केले.शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या मार्गदर्शनात उपतालुका प्रमुख रमेश झाडे व युवासेनेचे तालुका प्रमुख बंटी मालेकर यांच्या यांच्या पुढाकाराने परिसर साफ करण्यात आला.
परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
ही येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी तर नाही अशे चित्र रामपूर मध्ये सध्या आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत