आंबे तोडायला शेतात गेले अन् अंगावर वीज कोसळली #chandrapur #Washim

Bhairav Diwase
0

वाशिम:- राज्यात रविवारी अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. याच दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात बाप लेक आंबे तोडण्यासाठी शेतात गेले असता अचानक झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. (He went to the field to cut mangoes and was struck by lightning)

निवास कदम (वय, ३१) असे अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, गोविंदा कदम (वय,७०) असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील आहे. निवास हा त्याचे वडील गोविंदा यांच्यासह शेतात आंबे तोडायला गेले होते. मात्र, त्यावेळी झाडावर वीज कोसळल्याने निवासचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, गोविंदा हे गंभीर जखमी झाले आहेत. घरातील तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कदम कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)