Top News

पोंभुर्णा तालुक्यात जागतिक पर्यावरण दिन साजरा #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा:- चांदा वनविभाग चंद्रपूर, वनपरिक्षेत्र पोंभुर्णा अंतर्गत केमारा गावामध्ये ०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेऊन पर्यावरण विषयी माहिती देण्यात आली. (World Environment Day celebrated in Pombhurna taluka)


डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना अंतर्गत संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सहभागाने वन विभागामार्फत घनोटी तुकुम, सीताबाई तुकुम, गंगापूर, खरमत या गावातील 85 युवकांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरणाचे प्रतीक म्हणून रोपांची पूजा करून रोप लावून पर्यावरण दिन साजरे करण्यात आले.

प्रशिक्षण देणारे नरेंद्र सूर्यवंशी, एक्सलेंट ड्रायव्हिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, छिंदवाडा, मध्य प्रदेश, कार्यक्रमाचे अध्यक्ष फणिंद्र गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा, प्रमुख अतिथी राहूल धाईत, वनपरीक्षेत्र अधिकारी, प्रमुख पाहुणे सचिन पोतराजे सरपंच ग्रामपंचायत केमारा, आनंदराव कोसरे क्षेत्र सहाय्यक पोंभुर्णा, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष केमारा, घनोटी तुकुम, सीताबाई तुकुम उपस्थित होते. तसेच अजय ढवळे वनरक्षक घनोटी तुकुम, प्रशांत शेंडे वनरक्षक देवाडा खुर्द, कु. शितल कुळमेथे वनरक्षक केमारा व वन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने