सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमूर येथे तालुका कांग्रेस कमिटीचा धडक मोर्चा #chandrapur #chimur

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- दि. ५ जुन २०२३ रोजी सोमवारला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर तालुक्यातील होत असलेले सार्वजनिक बांधकाम उपविभागिय कार्यालय अंतर्गत होत असलेले निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रिट रोड नाल्याचे कामे मा. प्रभारी उपविभागीय अभियंता यांच्या आशीर्वादाने सुरू आहे. म्हणून असे खराब कामे होऊ नये असे भ्रष्टचार करणारे उपविभागीय अभियंता यांची चौकशी करून केलेल्या निकृष्ठ दर्जाचे कामांनबाबत यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी ७४ चिमुर विधानसभा समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांचे नेतृत्वात तालुका काँग्रेस कार्यालयातून ते सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर पर्यंत धडक मोर्चा काढणत आला.

या वेळी तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, शहराध्यक्ष अविनाश भाऊ अगडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृष्णाजी तपासे,तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नागेंद्र भाऊ चट्टे, ओबीसी विभाग तालुका अध्यक्ष विलास डांगे,माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर,बाळुभाऊ बोबाटे,महिला तालुका अध्यक्ष वनिताताई मगरे, महिला शहराध्यक्ष राणीताई थुटे,माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर,माजी पंचायत समिती सदस्य नर्मदाताई रामटेके, मीडिया प्रमुख पप्पू शेख, माजी सरपंच बोडधा प्रभाकर भाऊ मेश्राम, घनश्याम रामटेके,दीपक जी कुंभारे, रुपचंद शास्त्रकार,मंगेश भाऊ घ्यार, अक्षय लांजेवार, अमोल पोहनकर, दिलीप वघारे,कल्पना इंदुरकर, ममता ताई भिमटे, प्रीती ताई दीड मुठे, दीक्षाताई भगत, सहनाज अन्सारी,रिता अंबादे, रेखाताई मोहीनकर, नीलम ताई शंभरकर,संपुर्ण पदाधिकारी,महिला मंडळ व युवक व कार्यकर्ते उपस्थित होते,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत