बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा पूल प्रवाशांसाठी पुन्हा सुरू #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
0

बल्लारपूर:- पाच महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेला बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) 26 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू करण्यात आला आहे. प्रवाशांच्या पाच नंबर फलाट वाहतुकीसाठी फक्त एकच पूल होता. प्रवाशियांचे अडचणी बघून अजय दुबे. सदस्य राष्ट्रीय रेल्वे ग्राहक सल्लागार परिषद, रेल्वे मंत्रालय. नवी दिल्ली यांनी लवकर सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते.

या कार्यासाठी महाराष्ट्राचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर, रेल्वे मंत्रालय नवी दिल्लीचे ईडीपीएम नीरज शर्मा. मध्य रेल्वे मुंबईचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी. मध्य रेल्वे नागपूरचे डीआरएम तुषारकांत पांडे. वरिष्ठ डीसीएम आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ डीईएन पद्मनाभ झा. बल्लारशाहचे एईएन सुबोध कुमार यांच्यासह सर्व रेल्वे अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

पुलाच्या पुनःप्रारंभ प्रसंगी स्टेशन अधीक्षक नंदनवार, आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार पाठक, वाणिज्य निरीक्षक मिश्रा. मिथिलेश पांडे सरचिटणीस भाजयुमो चंद्रपूर जिल्हा. सुजित निर्मल जिल्हा सरचिटणीस भाजपा उत्तर भारतीय. संदीप पोडे जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो. श्रीकांत उपाध्याय विदर्भ प्रदेश चिटणीस भाजपा कामगार मोर्चा, शेख करीम जिल्हा उपाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा. अशोक सोनकर जिल्हा सचिव भाजपा कामगार मोर्चा, अभिनेश पांडे, युगल मेहंदळे. बुधराज निषाद आदींची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)