जनावर तस्करीचा कंटेनर जप्त; कंटेनर चालक फरार #chandrapur #pombhurna #sindewahi

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिंदेवाही पोलिसांनी जनावरे तस्करीचा कंटेनर जप्त केला आहे.सविस्तर वृत्त असे कि पोलिस स्टेशन सिंदेवाही अंतर्गत दिनांक २३/०६/२०२३ रोजी ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हान,पोलीस उपनिरीक्षक महल्ले,पोलीस शिपाई रंधीर हे परीसरात पेट्रोलिंग करित असतांना मुखबिर कडून खबर मिळाली कि, एका कंटेनरमध्ये अवैधरित्या जणावरांची वाहतूक केली जात आहे.

अशी खात्रीशीर खबर मिळाल्यावरुण लगेच शिवाजी चौक सिंदेवाही येथे नाकाबंदी लावण्यात आली. सिंदेवाही पोलीस हे नाकाबंदी दरम्यान वाहणे चेक करीत असता KA 51AH 1079 या क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने पोलीसांच्या दिशेने आला.तेव्हा सदर वाहनास पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता कंटेनरचा चालक वाहन न थांबविता नाकाबंदी तोडुन भरधाव वेगाने समोर निघुन गेला.

त्यानंतर नाकाबंदीतील अधिकारी व कर्मचारी हे सरकारी वाहनाने त्या कंटेनरचा पाठलाग करू लागले तेव्हा तो कंटेनर आणखीच वेगाने पूढे जात होता.सिंदेवाही पोलीस स्टेशनची हद्द सोडून तो मूल हद्दीत गेला.त्यामुळे तात्काळ सिंदेवाही पोलीसांनी मूल पोलिसांना सदर कंटेनर बाबत माहीती दिली.मात्र मुल येथे नाकाबंदी लागण्या पूर्वीच तो कंटेनर सावली रोडने लागुन समोर निघुन गेला.

पण सिंदेवाही पोलीसांचा पाठलाग करणे चालूच होते. पाठलाग करत सदरचा कंटेनर हा सिंदेवाही येथुन राजोली- मूल खेडि फाटा-चांदापूर फाटा- जुनासुर्ल- भेजगाव- थेरगाव- देवाडा - सूशि दाबगाव या मार्गाने प्रस्थान झाले असता पोलिस स्टेशन मुल, सावली, पोभुर्णा, गोंडपिपरी, उमरी पोतदार येथिल ठाणेदार यांना सदर वाहनाबाबत माहिती दिली. तेव्हा पोलीस स्टेशन उमरी पोतदार हद्दितील मौजा डोंगरहळदी गावाच्या जवळ सदर कंटेनरला थांबविण्यासाठी हायवा ट्रक रस्त्याला आडवा लावण्यात आला.
त्यामुळे सदर कंटेनर चालकाला पुढे जाण्याचा मार्ग न दिसल्याने कंटेनर तिथेच थांबवून चालक व त्याचा साथीदार हे कंटेनर थांबवुन जंगल भागात पळुन गेले.

📷
कंटेनरची पंचासमक्ष पाहनी केली असता त्यात ३२ नग बैल किंमत अंदाजे ३,१०,०००/- रू जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंडून भरलेले होते. सदर कंटेनरमध्ये असलेले जनावरे हे कत्तल करण्याचा उद्देशाने वाहतूक करत होते.सदर वाहनाचा व जनावरांचा पंचनामा करून सदर जनावरे मौजा लोहारा येथील गोशाळा येथे पोहचविण्यात आले.तसेच 3,10,000 किंमतीचे जनावरे व ४०,००,०००/- रू किंमतीचा कंटेनर असा एकूण ४३,१०,०००/- रू चा माल जप्त करण्यात आला असून पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे अप. क. २७५/२३ कलम प्राणि संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे सदरचा कंटेनर सिंदेवाही पोस्टेला जप्त आहे.पुढिल तपास पोउपनि भाष्कर ठाकरे पो.स्टे. सिंदेवाही हे करीत आहेत.

1 टिप्पणी: