पोंभूर्ण्यातील रस्त्यावर वाहतोय लालसर पाणी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

सुरजागडच्या गाड्यातून सांडलेला कच्चा लोहखनिज कारणीभूत

मानवीय आरोग्यास धोकादायक; तरीही प्रशासनाची चुप्पी

पोंभूर्णा:- तीन-चार दिवसांपूर्वी पावसाने सर्वत्र दमदार सुरुवात केली होती. रविवारलाही वरूणराज्याची कृपा पोंभूर्ण्यात बरसली. दमदार पावसाने पोंभूर्ण्यातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावरून पाण्याचा लोट निघाला खरा मात्र तो लालसर रंगाचा होता.

सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रक गाड्या गावातून सुसाट चालत असल्याने त्यातील लोहखनिजाचा कच्चा माल रस्त्यावर इतरेत्तर सांडत असतो. पावसामुळे रस्त्यावर सांडलेला कच्चा लोहखनिज आता लालसर पाण्याच्या रूपाने रस्त्यावर वाहू लागला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार असल्याचेही बोलल्या जात आहे. खनीजाचा लालसर रंगाचा पाणी पोंभूर्णा शहरातून वाहतांना दिसत असल्याने सुरजागड लोहप्रकल्पाचे लोहखनिज वाहतूकीच्या गाड्या शहरातून बंद करण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरू लागली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरून लोहखनिजाचे उत्खनन व भरधाव वाहतुक पोंभूर्णा शहरातील रहदारीच्या मार्गाने रात्रंदिवस सुरू आहे. या गाड्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही. वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून या रस्त्यावर कच्चा लोहखनिज रस्त्यावर सांडत आहे. पावसामुळे आता ते पाण्यात मिसळून लालसर पाण्याच्या रूपाने रस्त्यावरून वाहू लागला आहे. हा लालसर वाहणारा पाणी नाली, तलाव व नाल्यांत जमा होत आहे. यातील पाण्याचा प्रत्यक्षात संपर्क होत असल्याने यामुळे मानवीय आरोग्याला तसेच गुरेढोरे, पाण्यातील जीव जंतूंना हे हानिकारक राहणार आहे. यामुळे पोंभूर्णा शहरातील नागरीकांना असुरक्षीतता वाटत आहे. भविष्यात अनुच्चीत घटना नाकारता येण्यासारखी नसल्याने पोंभूर्णा शहरातून सुरू असलेली लोहखनिज वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी शहरवासीयांनी प्रशासनाकडे केली आहे.

"कच्चा लोहखनिज रस्त्यावर सांडल्यामुळेच रस्त्यावरून लालसर पाणी वाहत आहे. हा पाणी गावतलावात जमा होत असल्यामुळे नागरीकांचे तसेच पशू पक्ष्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जीवावर उठलेली सुरजागडची वाहतूक तात्काळ बंद करा."
बालाजी मेश्राम, नगरसेवक पोंभूर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)