(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील नंदोरी येथील नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सर्व सभासदांची एक सभा नुकतीच दि.२४ जून रोजी संपन्न झाली. सभेत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाने पेरणी, तणनाशकाची फवारणी यंत्राद्वारे करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे टोकन यंत्र, धनाची पेरणी, बीबीएफ द्वारे सोयाबीनची पेरणी, बीबीएफ द्वारे रंगांचा वापर इत्यादींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच सर्व भांडवलदार शेतकऱ्यांना सोयाबीन किटचे वितरण करण्यात आले. यावेळी एका वीसीडीएस कार्यशाळेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. बीज प्रक्रिया ड्रमच्या द्वारे करून शेतकऱ्यांना औषधीची माहिती देण्यात आली.
सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विभागाच्या वतीने मदेवार, झाडे, ठेंगणे, हिवसे इत्यादींनी कृषी विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विशेष मार्गदर्शक म्हणून प्रल्हादजी वरखडे होते. कंपनीचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे संचालक संदीप झाडे ,कपिल रांगनकार, प्रकाश निब्रड, हर्षाली एकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप एकरे यांनी विशेष प्रयत्न केले. भविष्यात नंदोरी शेतकरी उत्पादक कंपनीची वाटचाल शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी राहील अशी ग्वाही कंपनीच्या संचालक मंडळांनी यावेळी उपस्थित सभासदांना दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत