आयुध निर्माणी हायस्कूलचा उत्कृष्ट निकाल #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0
भद्रावती:- येथील चांदा आयुध निर्माणीतील आयुध निर्माणी हायस्कूलचा इयत्ता दहावीचा उत्कृष्ट निकाल लागला असून उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

या निकालात शाळेचे ५५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत, ३४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात कु.भाग्यश्री विजकापे ही विद्यार्थी विद्यार्थिनी ९३.४० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आली आहे. तर कु . रफतआरा शेख ही विद्यार्थिनी ९३.२० टक्के गुण मिळवून द्वितीय आली आहे. तर कु. मान्यता राम ही विद्यार्थिनी ९१.८० टक्के गुण मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिली आहे. कु. नुपूर येरगुडे ९१ टक्के, कु.लोचना भरडकर ९०.२० टक्के, कु . श्रीतिजा मेश्राम ९०.२० टक्के गुण मिळवून गुणवंत ठरले आहेत. विशेष म्हणजे कु . भाग्यश्री विजकापे आणि गौरव मत्ते यांनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त केली आहे.

 या गुणवंत विद्यार्थ्यांचा यशात आयुध निर्माणी अंबाझरी क्षेत्राचे महानिदेशक जुगनू गुप्ता, चांदा आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक विजयकुमार यांचे आशीर्वाद आणि शाळेचे प्राचार्य शिवनंदन तिवारी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सामुहिक प्रयत्नांचे फलित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)