भद्रावती:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावतीचे कार्याध्यक्ष सुनील दैदावार यांची मुलगी कु. ईशिता सुनील दैदावार ही इयत्ता दहावीच्या मार्च २०२३ च्या परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवून श्री साई कान्व्हेंटमधून द्वितीय आल्याबद्दल तिचा नुकताच सत्कार करण्यात आला.
तिच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने येथील हाॅटेल सनी पाॅईंट येथे तिचा पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य रुपचंद धारणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे, कार्याध्यक्ष सुनील दैदावार, उपाध्यक्ष पवन शिवनकर, सरचिटणीस शाम चटपल्लीवार, संघटक पुंडलिक येवले, प्रसिध्दी प्रमुख महेश निमसटकर, भाग्यश्री दैदावार, आराध्या दैदावार उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत