लांब पल्ल्याच्या बसमध्ये विध्यार्थ्यांना प्रवासासाठी केला जातो मज्जाव #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0
ग्राहक पंचायत भद्रावती ने घेतली दखल
भद्रावती:- चंद्रपूरला शिक्षणासाठी भद्रावती तसेच आजुबाजुच्या गावावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब पल्ल्याच्या बसचे चालक वाहक बसमध्ये बसण्यास मज्जाव करीत असून अशा चालक व वाहक विरोधात असंतोष निर्माण झाला असून अशा चालक वाहकांवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी आणि इतर प्रवाशांनी केली आहे.

भद्रावती, वरोडा येथून शिक्षणाकरिता विद्यार्थी व नोकरी करण्याकरिता नोकरदार वर्ग चंद्रपूरला एस.टी.बसने रोज ये-जा करतात. परंतु चंद्रपूर येथुन भद्रावती ला येणाऱ्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर - नागपूर बस तसेच अन्य लांब पल्ल्याच्या बसमध्ये बसण्यास वाहकांकडुन मज्जाव करण्यात येतो. यासंबंधीची तक्रार ग्राहक पंचायत भद्रावती यांना प्राप्त होताच ग्राहक पंचायत भद्रावतीच्या चमुने त्वरित चंद्रपूर आगार व्यवस्थापक यांची भेट घेवुन त्यांना पत्र दिले. आगार व्यवस्थापक यांना भेटुन विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना कोणत्याही बसमधुन प्रवास करण्यास थांबवू नये असे सांगण्यात आले.
यावेळी ग्राहक पंचायत भद्रावती चे पदाधिकारी वसंत वऱ्हाटे, वामन नामपल्लीवार, जीतेंद्र चोरडिया, आण्याजी ढवस, प्रभात कुमार तन्नीरवार तसेच ग्राहक पंचायत गोंडपिपरीचे संतोष आस्वले, शंकर पाल, पत्रु बक्षे आदी उपस्थित होते.
आजच त्वरित पत्रक काढुन सर्व बस वाहकांना आणि चंद्रपूर आगार कार्यालयास सुचना दिल्या जाईल आणि यानंतर विध्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
प्रीतेश रामटेकेआगार व्यवस्थापक, चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)