Top News

वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा लवकर सुरळीत करा #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी
पोंभुर्णा:- तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावलेली आहे.यात पोंभूर्णा तालुक्यातील बहुतांश गावात प्रचंड हानी झाली असून अनेक घरांचे छत उडाले तर अनेक विद्युत खांब कोलमडले यामुळे अनेक गावातील विद्युत प्रवाह वारंवार खंडित होत आहे.भर उन्हाळ्यात लाईनीचे ये-जा होत असल्याने अनेकांना त्याचा फटका बसत आहे.लाईनीचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारला विज वितरण कंपनीला समस्यांचे निवेदन देण्यात आले.

तालुक्यात दोन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावत मौजा वेळवा,भिमणी,कवठी,घोसरी परिसरात हैदोस माजवला आहे.अनेक घरांचे छत उडाले असून काही लोकांचे भिंती कोसळले आहेत. तर भिमणी व कवठी या गावात लावलेले आरो प्लॅन्टचे लोखंडी शेड उडून गेले आहेत.अनेक इलेक्ट्रिक पोल वाटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला असल्याने.अनेकांना याचा मोठा फटका बसत आहे.वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा तत्काळ दुरुस्त करून सुरळीत चालु करावे या मागणीला घेऊन शिवसेना (शिंदे गट) पोंभूर्णा यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देतांना उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला, तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,शिवसेना नेते व माजी तालुका प्रमुख विनोद चांदेकर, शिवसेना कार्यकर्ते सुनील ठाकूर, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने