पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे गुरुनगरमधील टाॅवरचे काम थांबले असून नागरिकांना मिळाला दिलासा #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यामुळे भद्रावती शहरातील गुरुनगर वार्डातील टाॅवर उभारणीचे काम थांबविण्यात आले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


प्राप्त माहितीनुसार, येथील गुरुनगर वार्डात ऐन पावसाळ्यात टाॅवर उभारणीचे काम सुरू होते. त्यामुळे परिसरातील घरांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे वार्डातील नागरिकांनी टाॅवर उभारणीच्या कामाला विरोध केला.परंतु काम थांबविण्यात आले नाही. त्यामुळे या नागरिकांनी माजी नगरसेवक तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अफझलभाई, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री इम्रान खान आणि भाजपा कार्यकर्ते पवन हुरकट यांना माहिती दिली. त्यानंतर हे तीघेही सदर ठिकाणी गेले. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच भद्रावती नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेरकी यांना सदर टाॅवरचे काम चार महिनेपर्यंत थांबविण्याचे तोंडी आदेश दिले. त्यानुसार मुख्याधिकारी शेरकी यांनी पावसाळा संपेपर्यंत चार महिने टाॅवरचे काम थांबविले आहे. त्यामुळे गुरुनगरवासियांना दिलासा मिळाला असून त्यांनी पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, अफझलभाई, इम्रान खान, पवन हुरकट व मुख्याधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.