जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न #chandrapur #blooddonation


चंद्रपूर:- शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक तथा भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगराचे जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे युवकांतर्फे रक्तदान करण्यात आले. सध्याच्या स्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीमध्ये भासात असलेल्या रक्त साठ्याच्या तुटवड्यामुळे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर सुरू होण्याआधी जयश्री आत्राम यांच्या नेतृत्वामध्ये 15 युवतीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला.

रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगराचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, चंद्रपूरच्या माजी महापौर राखीताई कंचर्लावार, महामंत्री राजेंद्रजी गांधी, ब्रिजभूषणजी पाझारे, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, माजी नगरसेविका छबुताई वैरागडे, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार हे उपस्थित होते.
रक्तदान शिबिरा च्या यशस्वीतेसाठी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य यश बांगडे, उपाध्यक्ष राहुल पाल मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार, गजानन भोयर, सचिव प्रवीण उरकुडे मनीष पिपरे, सतीश तायडे, सचिन यामावार, स्वप्निल भोपये, राहुल जाधव व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत