पूजा आणि आकांक्षाची उत्कृष्ट कामगिरी #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिपमध्ये मिळविले सुवर्ण आणि कांस्य पदक

भद्रावती:- राजस्थानमधील कोटा शहरात दि.१७ व १८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या आर्ट ऑफ लर्निग इन्स्टिट्यूट नवराष्ट्र १६ व्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिपमध्ये भद्रावतीच्या पूजा आणि आकांक्षाने उत्कृष्ट कामगिरी बजावली असून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

वरील स्पर्धेत भद्रावती येथून ३१ ते ५५ वयोगटात कु.पूजा देऊरकर आणि १ ते ७ वयोगटात कु.आकांक्षा कटलावार सहभागी झाल्या होत्या. त्यात पूजा देऊरकर हीने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनशिप राउंडमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला. या दोन्ही प्रथम क्रमांकामुळे पूजाला दोन सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले. तर आकांक्षा कटलावार हीने १ ते ७ वयोगटात तृतीय क्रमांक पटकावल्याने तीला कांस्य पदक बहाल करुन गौरविण्यात आले. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून स्पर्धक सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)