Top News

परम् पुज्य ग्रामगिताचार्य तुकारामदादा यांचा १७ वा स्मृतिदिनोत्सव संपन्न #chandrapur #bramhapuriब्रम्हपुरी:- दि.८ जुन २०२३ ला भु -वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी येथे परम् पुज्य ग्रामगिताचार्य तुकारामजी दादा यांचा १७ वा स्मृतिदिन उत्सव मार्गदर्शक व संचालक श्री सुबोधदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शक म्हणून लाभले.


यावेळी कार्यक्रमाला डॉ.शिवनाथजी कुंभारे श्री गुरुदेव सेवामंडळ गडचिरोली, सुभाषभाऊ कासनगोट्टुवार, माजी नगरसेवक, चंद्रपूर,रविदादा मानव संचालक अध्यात्म गुरुकुल मोझरी,हिरालालजी खोब्रागडेआसगाव,ज्ञानेश्वरजी रक्षक नागपुर,संत साहित्य प्रचारक जनार्दन देठे सर वरोरा, अध्यक्ष सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर,लालचंदजी नखाते, मोखारा, प्रविणभाऊ राऊत,अध्यक्ष,पोलीस समन्वयक समिती,कृष्णाभाऊ सहारे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर,सौ.योगिताताई लांडे वरोरा,सौं.बेबीताई काकडे महिला प्रबोधनकार श्री नवलाजी मुळे अध्यक्ष,भु-वैकुंठ अड्याळ टेकडी, सुश्री रेखाताई कार्याध्यक्ष, भु-वैकुठ अड्याळ टेकडी आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यात पू तुकाराम दादांनी भु वैकुंठ अड्याळ टेकडी कशी श्रमदान मधून निर्माण करून येथे ध्यान,प्रार्थना, सत्संग,मौन साधना शिबिर,अध्यात्म गुरुकुल,नैसर्गिक शेती, गोरक्षण,पंचगव्य,महिला सक्षमीकरण,योग निसर्गोपचार,ग्रामसभा,पंचायत राज,ग्राम संरक्षण दल,ग्राम निर्माण शिबिर,व्यायाम व सुसंस्कार शिबिर ग्रमोद्योग इत्यादी विषयांवर अभूतपूर्व कार्य करून समाजात ग्राम स्वराज्याची एक पहल निर्माण केली,याचे वक्तव्य गावातील गुरुदेव भक्तांनी विशद केले.

या कार्यात अखिल भारतीय संस्था गूरुकुंज मोझरी यांनी जी ढवळाढवळ,लुटमार चालवली आहे;२५ एप्रिल २०२३ रोज येथील लोकांचे खोलींचे कुलूप तोडून समान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,त्यांच्या या कुटील कृत्याविषयी सर्वांनी त्यांचा जाहीर निषेध केला.ही सेवा आणि सत्येची लढाई आपण तन मन धनाने लढू न्यायालयात सुध्धा सुप्रीम कोर्ट पर्यन्त या राक्षसांना दादा देऊ आणि प्रसंगी वेळ आल्यास साम,दाम,दंड, भेदाने सुध्दा आपण तयार राहू, असे संकल्प अनेक गुरुदेव भक्तांनी घेतले.या कार्यासाठी त्वरित लोकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकल्प तेव्हाच समर्पित केले.नव्हे तर या संकल्पावर आधारितच खरी श्रद्धांजली लोकांनी मोठ्या प्रमाणात पू. तुकाराम दादांना अर्पण केली आणि तसे जाहीर सुध्धा केले.
श्री रवि दादा मानव यांनी अध्यात्म गुरुकुल मोझरी व श्री दिलीप भोयर भाऊ यांनी सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर चा कार्य अहवाल आणि तेथील अखिल भारतीय संस्था मोझरी ची ढवळाढवळ जाहीर केला.सर्व जनतेच्या लक्षात ही बाब आणून देण्यासाठी लवकरच अड्याळ टेकडी गुरुकुल मोझरी व पंढरपूर चे सर्व सेवक कार्यकर्ते आत्मक्लेश साठी समाधी स्थल मोझरी ला बसवण्याचे ठरले.
  त्याचे नियोजन पुढे केले जाईल असे रवी दादा म्हणाले.सुभाष भाऊ कासनगोट्टुवार यांनी पू दादांच्या कार्यावर समाधान व्यक्त करून अड्याळ टेकडीला सर्व प्रकारे साथ देण्याचा संकल्प केला.ते चंद्रपूर शहरात अव्याहत गुरुदेव सेवा मंडळचे कार्य करीत असतात.अड्याळ टेकडी वरील लोकांच्या सेवा,त्याग,श्रम व समर्पण ची त्यांनी तोंड भरून स्तुती केली आणि या राक्षसांना दूर करण्यासाठी सर्व गुरुदेव भक्तांनी एकजूट होण्याचे आवाहन केले. 
       डॉ नवलाजी मुळे यांनी पू दादांनी कसा हा प्रयोग सरकार मान्य किंवा रजिस्टर न करता लोकमान्य केला आहे,याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.सुश्री रेखा ताई यांनी घरचे धनी कसे घराचे वैरी बनले त्याचा सविस्तर अहवाल दिला.हिरालाल खोब्रागडे यांनी येथे समर्पित जीवन करून राहून कार्य करणाराच येथील अधिकारी होऊ शकतो घरी बसून उंटावरून शेळ्या हकालनारा नाही.आणि म्हणून येथे सुबोधदादांची नियुक्ती करण्यात आली याचे स्पष्टीकरण वक्तव्य केले.सौ योगिता ताई लांडे वरोरा यांनी सुध्दा याचे समर्थन केले व ही लढाई केवळ येथे राहणाऱ्या सुबोध दादा ची नसून आपण सर्वांची आहे आणि आपण ती लढली पाहिजे म्हणून आवाहन केले.प्रवीण भाऊ राऊत यांनी ग्रामसभा पंचायत राज ची माहिती देत अड्याळ टेकडी हे त्याचे कर्म स्थान असल्याचे सांगून त्याच पद्धतीने आपण येथील लढा लढू असे सांगितले.ज्ञानेश्वर रक्षक दादांनी सुध्दा याच विषयावर बोलून त्यांचे पू.तुकाराम दादा सोबतचे अनुभव कथन केले.डॉ कुंभारे साहेबांनी मार्गदर्शन करून सर्वांना प्रोत्साहन दिले.पोलिस नागरिक समन्वय समिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.शेवटी समारोपीय वक्तव्यात संचालक श्री सुबोधदादा यांनी गेल्या तीन वर्षातील घटनाक्रम थोडक्यात सांगून अड्याळ टेकडी ही अखिल भारतीय संस्था मोझरी यांची कालही नव्हती आजही नाहीं आणि पुढेही होणार नाही.याचे प्रमाण देऊन सर्वांना प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले आणि पांडवांचे हक्काचे राज्य असून त्यांना जसा अन्यायाचा त्रास भोगावा लागला होता,त्याप्रमाणे आपल्यालाही त्रास होत आहे आणि पुढेही होईल तो भक्ती आणि सेवेच्या साहाय्याने आपल्याला सहन करावा लागेल.आपण साधू संतांच्या अहिंसक व असहकार मार्गाने हर प्रकारे हा लढा लढू असे जाहीर केले.कार्यक्रमाला विदर्भातील विविध जिल्ह्यातील हजारो गुरुदेव भक्तांनी या कार्यक्रमाचा सक्रियपणे लाभ घेतला.शेवटी गुरुकुल मुलंमुलींनी गायलेल्या 'वह तुकारामजी दादा' या गीताने आणि शांती पाठाने कार्यक्रम ची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने