मी जे ठरवतो ते करूनच दाखवतो:- धर्मराव बाबा आत्राम #chandrapur #bramhapuri

ब्रम्हपुरी:- स्थानिक पातळीवर लहान मोठ्या नेत्यांमध्ये गटबाजी मुख्यत्वे दिसते मात्र अशा गोष्टींना आपण विशेष महत्त्व देत नाही,ज्या महाविकास आघाडीचे सूत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनी आपल्याला प्रथमच चिमूर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राची उमेदवारी जाहीर केली आहे,म्हणूनच आपण ताकतीने मैदानात उतरलो आहोत त्यासाठी पक्षाच्या नेत्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठी कसलीही कसर कमी पडू देणार नाही त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद सेक्टरमध्ये युवकांच्या फळ्या तयार करून प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून कार्य केले तर आपला खासदार निश्चितच होईल.मी जे ठरवतो ते निश्चितच करून दाखवतो असे स्पष्ट विचार राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.

ब्रह्मपुरी येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक ७ जून२०२३ रोज बुधवारला सायंकाळी ब्रह्मपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नेते व कार्यकर्ते यांच्याशी धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी कार्यकर्ता संवाद व आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य राष्ट्रवादीचे युवा नेते अविनाश आ.राऊत यांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक प्रशांत घुमे सरचिटणीस प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केले सदर आढावा बैठकीला नितीन भटारकर कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक,रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष गडचिरोली,लीलाधर भरडकर जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस गडचिरोली,हिराचंद बोरकुटे ज्येष्ठ नेते,बेबीताई उईके चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्ष, संचिता मेश्राम अध्यक्ष विधानसभा,गणेश बावणे, नितीन घुबडे,वासुदेव सोंदरकर तालुकाध्यक्ष ब्रह्मपुरी,अश्विन उपासे तालुकाध्यक्ष युवक ब्रह्मपुरी,कृपाल मेश्राम प्रदेश सचिव युवक,मनोज वझाडे शहराध्यक्ष ब्रह्मपुरी,अतुल राऊत जिल्हा सचिव युवक,पराग बनपूरकर शहराध्यक्ष युवक, सतीश ठेंगरे माजी तालुकाध्यक्ष, नौशाद सय्यद,मुस्ताक कुरेशी अल्पसंख्यांक सेल,नोगेश बगमारे,किशोर भोयर,सुनील मसराम,तारकेश्वर तोंडरे,गिरीधर गुरफुडे,विनोद दोनाडकर,राहुल भोयर,रमेश वकेकार,नरेंद्र बांन्ते,रोशन मेश्राम,रजत जतपेठे,गजानन नवलाखे,गणेश नवलाखे,आदेश मालोदे,राहुल मैंन्द,आदेश डोईजड,अरविंद मोरांडे,रामू बनपूरकर,मंगेश नवलाखे,ओम प्रकाश मेश्राम,अश्विनी भनारे दामिनी चौधरी यांच्यासह अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत