Click Here...👇👇👇

प्लास्टिकचा अतिवापर घातक:- डॉ. स्निग्धा कांबळे #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
दिव्यदीप ने साजरा केला जागतिक पर्यावरण दिवस

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील नामांकित एनजीओ दिव्यदीप बहु.संस्थेच्या वतीने काल जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.प्लास्टिक प्रदूषणावर मात करा हा विषय घेऊन या ngo च्या वतीने पाचशे कापडी पिशव्यांचे स्थानिक शिवाजी चौकात जनतेला मोफत वितरण करण्यात आले.


पर्यावरण अबाधित राखणे हे सर्वांच्या खूप हिताचे झाले आहे.मानवी जीवन आणि जगातील इतर जीवजंतुंवर दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे.त्यात प्लास्टिकचा अतिवापर ही एक समाजातील प्रमुख समस्या बनली आहे.प्लास्टिकचा अतिवापर खूप घातक असून सर्व जनतेनी 'प्लॅस्टिकला नाही म्हणायला शिकले पाहिजे' व प्लास्टिक मुक्त जीवन जगून पर्यावरणाचा संतुलन राखण्यास सहकार्य करण्याचे आवाहन दिव्यदीप बहु. संस्था ब्रम्हपुरीच्या अध्यक्षा डॉ.स्निग्धा कांबळे यांनी केले.
विविध रोगराई चा जन्म पर्यावरणाच्या असंतुलनामुळे होत आहे.अनावश्यक वस्तूचा वापर आणि मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड यामुळे आपल्या पर्यावरण संतुलन बिघडले आहे. त्यात एक प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी मारक ठरत आहे.त्यामुळे आजपासून प्लॅस्टिकला तिलांजली देऊन आपण पर्यावरण अबाधित राखण्यासाठी खारीचा वाटा उचलावा असे दिव्यदीप या एनजीओ तर्फे सांगण्यात आले.
दिव्यदीप समाजोपयोगी प्रत्येक क्षेत्रात कार्य करत असून एका वर्षातच विविध उपक्रम या एनजीओ च्या वतीने राबविण्यात आले. स्थानिक शिवाजी चौकात 'प्लास्टिक पिशवीला नाही म्हणा' हा विषय घेऊन जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.या उपक्रमात कापडी पिशवी सोबत प्रत्येकाला एक पत्रक देण्यात आले.त्यामध्ये प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी किती घातक आहे,त्याचे मानवी जीवनावर किती वाईट परिणाम होतात तसेच प्लॅस्टिकमुळे हवा,पाणी,माती यांचे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याबद्दलची माहिती देण्यात आली होती. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या NGO च्या टीमने प्लॅस्टिक पिशवीला नाही म्हणायला शिका हा संदेश दिला.
यावेळी दिव्यदीप बहु.संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.राजेश कांबळे,सचिव सतीश डांगे,सहसचिव ऍड.आशिष गोंडाने,कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभुर्णे,सदस्य डॉ.ज्योती दुफारे,प्रा.वसुधा रामटेके,मंगेश नंदेश्वर,लखन साखरे,संजय बिंजवे,प्रा.कुंदन दुफारे,नरेश राहाटे,आदी उपस्थित होते.
कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी उपरोक्त टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.