वर्धा नदीत बुडून कंत्राटी कामगाराचा झाला मृत्यू #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- वर्धा नदी बेलसनी ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराकडून सुरू असून त्या कामावर बाहेरगावचे कामगार काम करीत आहेत. रविवारी दुपारी एक युवक नदीच्या पाण्यात पोहायला गेला असता, त्याला खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. Contract worker dies after drowning in Wardha river


मुकेश मडावी असे मृतक युवकाचे नाव असून तो वडगाव, चंद्रपूरचा रहिवासी असल्याचे कळते. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी बचाव पथकाच्या बोटीने शोध घेतला असता, सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)