सिंदेवाही:- घराचे बांधकाम करण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे रेती मागवली. मात्र, ट्रॅक्टर मागे घेताना घरमालकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली आणि लोखंडी गेटमध्ये दबून मृत्यू झाल्याची घटना रत्नापूर येथे सोमवारी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान घडली. मनोहर ऋषी पात्रे (५१, रा. रत्नापूर) असे मृतकाचे नाव आहे.
मनोहर पात्रे यांनी घराचे बांधकाम करण्यासाठी रेती मागविली होती. संबंधित ट्रॅक्टर मालकाने सोमवारी पहाटे ४ वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४- एल ९६१९ द्वारे रेती आणली. मात्र, रेती टाकण्यासाठी जागा नसल्याने शेजारील घरी रेती टाकण्याचे सांगण्यात आले. यासाठी मनोहर पात्रे हे ट्रॅक्टरचालक लवकुश तोंडफोडे (२५) यांना ट्रॅक्टर मागे घेण्यासंदर्भात सूचना देत होते. याचवेळी ट्रॅक्टर-ट्राली आणि लोखंडी गेटमध्ये मनोहर पात्रे दबले गेले. गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घरची कमवती व्यक्ती मृत पावल्याने कुटुंबीयांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत