वलनी गावात महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती व समाज प्रबोधन मेळावा संपन्न
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर
चिमूर:- ढिवर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका संघटित व्हा व संघर्ष करा या त्री सूत्रीचा फार मोठा फायदा होऊ शकतो.राज्य घटनेच्या स्वातंत्र ,समता,बंधुत्व व न्याय या सविधानाच्या आत्म्यानुसार ढिवर समाज एकत्र आल्यास सामाजिक ऐक्य घडून आल्यास चिमूर विधान सभेचे चित्र बदलण्याची ताकद या समाजात असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष स्थानावरून डॉ दिलीप शिवरकर यांनी केले आहे.
वलनी येथील महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती व समाज प्रबोधन मेळाव्याच्या प्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य सदाशिव मेश्राम, मूर्तीदाते आशिष मेश्राम, जागा दाते, हरीजी भोयर, मंदाताई उईके यांचा जाहीर सत्कार करण्यात आला असून प्रकाश नान्हे, रमेश भानारकर, सभापती खेमराज मरसर्कोल्हे, शैलेश वागधरे, सरपंच अनिल बोरकर, प्रकाश सुरपाम,पोलीस पाटील शंकर बारेकर, पांडुरंग पर्वते, नानाजी मेश्राम, सौ विमल मेश्राम, सौ उर्मिला उईके, सौ पिंकी बारई,सौ ललिता राऊत, कु भारती उईके सौ मंदा उईके,अरुण सहारे, मनोहर शेंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार अरविंद मेश्राम यांनी केले.यावेळी ढिवर भोई समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.