राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८वे महाअधिवेशन तिरुपती येथे होणार #chandrapur

Bhairav Diwase
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८वें महाअधिवेशन 07 ऑगस्ट 2023 ला तिरुपती येथे होणार असे तिरुपती येथे झालेल्या प्रेस मिट मध्ये डॉ. बबनराव तायवाडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बोलत होते.

यावेळी बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास जाजूला, आंध्रप्रदेश बिसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर अण्णा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, क्रांतीकुमार, भास्कर गौड, नगमल्लेश्वर गौड, उपस्थित होते.

स्व. व्ही. पी सिंग यांनी मंडल आयोग लागू केला. या दिवसाची आठवण म्हणून साजरा केला जातो. या अधिवेशनात जातनीहाय जनगणना करण्यात यावी, केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रीमीलेरची मर्यादा मागील सहा वर्षा पासून वाढली नाही आहे ती वाढविण्यात यावी, ५०%आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात यावी, आदी मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी तसेच 26 मागण्यांवर मान्यवरांच्या उपस्थितीत या अधिवेशनात चर्चा होणार असून त्या पूर्ण करण्यासंबंधी ठराव पारित करून केंद्र सरकारला ते पूर्ण करण्यासाठी सादर केले जाणार आहे.