Click Here...👇👇👇

नदी घाटावर विद्युत शॉक लागून ११ शेळ्यांचा मृत्यू #chandrapur #chimur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शेती सिंचनाकरिता नदी घाटावर लावलेल्या विद्युत पंपचा वायर कटून असल्यामुळे पाणी पिण्यासाठी गेलेल्या 11 शेळ्यांचा विद्युत शाक लागून विद्युत शाक लागून मृत्यू झाला आहे.

ही घटना चिमूर तालुक्यातील बोडदा येथील नदी घाटावर शनिवारी उघडकीस आली आहे. या शेतकऱ्याचे लाखात नुकसान झाले असून आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे.

चिमूर तालुक्यातील बोडदा नदिघाटावर कापगते नदी डोहात शेतीला सिंचन करण्यासाठी पाण्यात मोटार पंप लावण्यात आले आहे. पंप चे विद्युत पुरवठा वायर लिकेज झाल्याने डोहातील संपूर्ण पाण्यात विद्युत प्रवाह निर्माण झाला होता. आज शनिवारी सकाळी 11 वाजता दरम्यान गावातील काही शेळ्या नदिघाटावर पाणी पिण्यासाठी गेल्या असत्या विद्युत प्रवाहाचा तिव्र झटका लागून अकरा शेळ्या ठार झाल्या. त्यामध्ये दोन बोकडाचा समावेश आहे. ह्या शेळ्या सहा लोकांच्या मालकीच्या होत्या.

लोहारा बोळधा मार्गावर गोधनी नदीवर पूल बनवला आहे. या पुलापासून पाचशे मिटर अंतरावर नदी डोह असून याच डोहातून शेतीला सिंचन करण्यासाठी पाणी उपसा केल्या जातो. डोहातील पाण्यात पाणबुडी मोटार पंप टाकला होता. सकाळी शेतीला पाणी पुरवठा सुरू होता. सकाळी चरायला सोडलेल्या शेळ्या चरत चरत नादिघाटावर पोहचल्या. पाणी पिण्यासाठी डोहावर उतरल्या असता आल्या आणी पाणी पीत असताना जोरदार विद्युत शॉक लागून जागीच ठार झाल्या. गुराख्याला दिसताच आरडाओरड केल्याने पंप बंद करण्यात आला.

विद्युत विभागाला या घटनेची माहिती होताच मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी केली असता पाण्यातील मोटार पंपाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या वायरमुळे पाण्याला विद्युत प्रवाहीत झाल्याने विद्युत शॉक लागल्याची माहिती विद्युत विभागाने दिली. तात्काळ शेळ्या मालकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.