कर्तव्यावर असताना बिअर पिणारे दोन पोलीस निलंबित chandrapur

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- पोलीस बंदोबस्तादरम्यान चक्क बिअर शॉपीमध्ये जाऊन बिअर ढोसणाऱ्या दोन पोलीस शिपायांवर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

उमेश मस्के, नरेश निमगडे अशी निलंबित पोलीस शिपायांची नावे आहेत. ब्रह्मपुरी जिल्हा निर्मितीसाठी १२ जून रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी ब्रह्मपुरी उपविभागातील पोलिसांच्या चमूची ड्युटी लावण्यात आली होती. यामध्ये तळोधी पोलीस स्टेशनमधील पोलिसांचाही समावेश होता. यात उमेश मस्के, नरेश निमगडे कर्तव्यावर होते.

दरम्यान, आंदोलन सुरूच असताना मस्के, निमगडे हे तळोधी पोलीस स्टेशन येथील दोन पोलीस शिपाई बिअर ढोसताना आढळून आले. त्यामुळे त्या दोघांना निलंबित केले आहे. त्यांच्यासमवेत असणारा तिसरा कर्मचारी मद्य पित नव्हता. परंतु, तोही मद्य दुकानात गेल्याने त्यावरही दुसरी कारवाई करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)