Top News

विजेचा शॉक लागून युवक जागीच ठार #chandrapur #chimur

चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या सिरपुर येथील युवकाचा दि 23 जूनला नवीन मकानाला पाणी टाकून झाल्यावर पाण्याच्या मोटारपंप चा वायर गुंडाळताना कटलेल्या वायर ला स्पर्श झाल्याने जोरदार झटका बसला आणि हातात वायर घेऊन जागेवरच त्याचा मृत्यू झाला.

सिरपुर येथील धनराज शामराव गावतुरे वय 38 वर्षे असे मृतकाचे नाव असून त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे सदर घराला पाणी देण्यासाठी जवळील विहिरीवर मोटारपंप लावला आहे त्या मोटारपंप चा कनेक्शन त्यांच्या घरात असून पंप सुरू करून मकानाला सकाळी 10 वाजता पाणी दिले त्यानंतर पाणी पूर्ण देऊन झाल्यावर मोटारपंप ची स्विच बंद करून पंप बंद केले परंतु घरातील कनेक्शन चे बोर्डावरील बटन बंद करण्याचे विसरले आणि पाऊस सुरू असल्याने मोटारपंप जवळून वायरची गुंडाळी करण्यासाठी वायर गुंडाळीत असताना वायर कटलेला असल्याने वायर कटलेल्या जागेवरून हाताला स्पर्श होताच धनराजला जोरदार झटका बसला.

वायर हाताला चिकटून धाडकन खाली पडला व जागेवरच ठार झाला जवळच पहिल्या वर्गात शिकत असलेला त्याचा मुलगा होता वडील पडलेले पाहून तो जोरदार बाबाला करंट लागला म्हणून ओरडत बाहेर पडला असता जवळील नागरिकांना व घरातील मंडळीला घटनेची माहिती मिळाली तात्काळ नागरिक गेले असता घरातील कनेक्शन बंद करून बोर्डातील वायर काढले असता धनराज मृत्यू पावल्याचे कळले लगेच पोलीस पाटील मंगेश भानारकर यांनी चिमूर पोलीसांना माहिती दिली.

तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले पोलीस निरीक्षक जांभुळे , शिपाई वाढई, मोहूर्ले यांनी प्रेताचे पंचनामा करून प्रेत उतरनिय तपासणीसाठी चिमूर उपजिल्हारुग्णालयात पाठविले असून सिरपुर गावात तरुण युवकाचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे धनराज गावतुरे यांच्या अचानक मृत्यु मुळें त्यांच्या कुटूंबियावर आस्मानी संकट कोसळले आहे त्यांच्या पचश्यात एक मुलगा एक मुलगी पत्नी आई बहीण बराच मोठा आप्तपरिवार आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने