सरपंचासह सदस्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश #Chandrapur #Korpana


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील मौजा बेलगांव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच तथा सदस्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आज घुग्गुस येथील माझ्या जनसंपर्क कार्यालयात भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.

यामध्ये सरपंच विनोद जुमनाके उपसरपंच बंडू तोडासे, ग्रा. पं. सदस्या कांताताई धुर्वे, पार्वताबाई मडावी, विमलबाई कुडमेथे, विनोद तोडासे, भारत मडावी यांचा समावेश आहे.

या सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून भाजप परीवारात मनःपुर्वक स्वागत केले. यासोबतच येत्या काळात गावाच्या विकासासाठी सर्वांनी सक्रियतेने पुढाकार घ्या! राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व बेलगावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तुमच्या सोबत आहोत. असा विश्वास याप्रसंगी सर्वांना दिला.

यावेळी अनू. जमाती मोर्चाचे अरूण मडावी, प्रमोद कोडापे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार, भाजयुमोचे दिनेश खडसे, तिरूपती किन्नाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत