भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी दिनेश सुर यांची पुन्हा वर्णी #chandrapur #Korpanaचंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव दिनेश सुर यांनी शिस्तभंग केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी दिनेश सुर यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली होती.

त्यानंतर २ जून २०२३ ला दिनेश सुर यांनी यावर आपला सविस्तर खुलासा करून जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या कार्यालयात माफीनामा सादर केला होता त्यानंतर जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी पक्षश्रेष्ठी सोबत चर्चा करून दिनेश सुर याना पून:च भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच भविष्यात पक्ष वाढविण्याकरिता आपण चांगले काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो अशा शुभेच्छा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी दिनेश सुर यांना दिल्या.

तसेच आपण जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहीर,भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावदादा भोंगळे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजयभाऊ धोटे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर,लोकसभा विस्तारक खुशालभाऊ बोंडे व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिषजी देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य करू असे दिनेश सूर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या