खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या जागी कोण लढणार? #Chandrapur #loksabha #loksabhaelection


काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावे चर्चेत; उमेदवाराच्या शोधासाठी ऑनलाईन सर्व्हे?

चंद्रपूर:- चंद्रपूरचे काँग्रेसचे दिवंगत खासदार स्व. बाळू धानोरकर यांचं निधन झाल्यानंतर चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. या ठिकाणी लोकसभेची पोटनिवडणूक होणार असल्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपचाही उमेदवार उतरण्याची शक्यता असल्याने काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार शोधण्यासाठी काँग्रेसने ऑनलाई सर्व्हेही घेतला आहे. मात्र, सध्या काँग्रेसमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सात नेते इच्छूक असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागणार? 
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेचे दिवंगत खासदार स्व. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी नुकतेच अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा आता रिक्त झाली आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर लोकसभेसाठी लवकरचं पोटनिवडणुक जाहीर केल्या जाईल काय? अशा चर्चांना उधाण आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा महाराष्ट्रात एकमेव खासदार म्हणून स्व. बाळू धानोरकर निवडून आले होते. अलीकडेच (३० मे रोजी) अल्पशा आजाराने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात खासदार स्व. धानोरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंद्रपूर लोकसभेची जागा आता रीक्त झाली. त्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून हालचालींना वेग आल्याचे दिसते आहे.

काँग्रेसमधून 7 नेत्यांची नावे चर्चेत; उमेदवाराच्या शोधासाठी ऑनलाईन सर्व्हे? 

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी ॲानलाईन सर्वेतून काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध घेण्यात येत आहे. खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेस कि इतर कुणाकडून हा सर्व्हे करण्यात येत आहे. हे अद्याप अस्पष्ट आहे. तर चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, विनायक बांगडे, मनोहर पाऊणकर, प्रकाश देवतळे आणि अनिल धानोरकर या सात नेत्यांची नावे चंद्रपूर लोकसभेसाठी चर्चेत आहेत.

कोण करतंय ऑनलाईन सर्व्हे?

चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार शोधण्यासाठी ॲानलाईन सर्वे नेमकं कोण करतंय? असा सवाल केला जात आहे. तसेच या सर्व्हेमुळे चर्चेला उधाणही आलं आहे. उमेदवार शोधण्यासाठी ॲानलाईन सर्वे काँग्रेसने सुरु केला की इतर कुणी? खासदार स्व‌. बाळू धानोरकर यांच्या निधनाला आठवडा लोटला नाही तर उमेदवार शोधण्याची घाई कुणाला? चंद्रपूर लोसकभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार शोधण्यासाठी ॲानलाईन सर्वे नेमका कोणत्या गटाने सुरु केला? असे सवाल करण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन सर्व्हेत पसंतीच्या उमेदवारापुढे टीक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आता पर्यंत खुप लोकांनी या सर्व्हेत सहभाग नोंदवून आपल्या नेत्यांना वोट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत