सरदार पटेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम #chandrapur #Gondwanauniversity


जनसंवाद विभागातील १० पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली जनसंवाद विभागाचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला असून सरदार पटेल महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. १० पैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

मुबारक शेख 9.41, अश्विन गोडबोले 9.41, शितल आत्राम 9.18, प्रियंका पुनवटकर 9.18, शुध्दोधन निरंजने 9.05, भैरव दिवसे 9.02, नरेश सहारे 9.00, आनंद इंगोले 8.98, प्रणाली रागीट 8.95, भिमराज बागेसर 8.92 या सर्व विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाच्या अंतिम वर्षाचा पदव्युत्तर परीक्षा श्रेणी बिंदू सरासरी उन्हाळी-2023 मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, जनसंवाद विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज मोहरीर, प्राध्यापक अरविंद खोब्रागडे, प्राध्यापक संजय रामगिरीवर, राखी तुडलवार तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे.

सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर जनसंवाद विभागात प्रवेश घ्यायचे असेल तर जनसंवाद विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. पंकज मोहरीर यांच्याशी संपर्क साधवा. 

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत