चंद्रपूरात बुधवारी मनसे शेतकरी सेनेचा जन आक्रोश मोर्चा #chandrapur #MaharashtraNavnirmanSena

चंद्रपूर:- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन मनसे शेतकरी सेनेतर्फे जन आक्रोश मोर्चाचे आंदोलन ७ जून रोजी करण्यात आले आहे. वरोरा नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा मनसे शेतकरी जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांच्या नेतृत्वात निघणार आहे. (Mass protest march of MNS Shektar Sena in Chandrapur on Wednesday)

परसोडा, काठोडा, रायपूर या गावांत आरसीसीपीएल कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येक सातबारा, एक नोकरी, ४० लाख रुपये एकर देण्यात यावे, जोपर्यंत एकमुस्त जमिनी घेणार नाही, तोपर्यंत कोणतेही उत्खनन करु नये, दलालामार्फत कोणताही खरेदी व्यवहार करू नये, अवकाळी पाऊस, जमीन खरडणे, गारपीट, अतिवृष्टीचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात सरसकट जमा करावे, सीएसआर फंडाचा वापर योग्य ठिकाणी करावा, पीकविम्याची रक्कम कुठलीही जाचक अट न टाकता शेतकऱ्यांना पीकविमा त्वरित देण्यात यावा, शेती तक्रार निवारण्यासाठी क्विक रिस्पॉन्स यंत्रणा सुरू करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या