चंद्रपूर जिल्ह्यात ट्रक आणि बसचा अपघात #chandrapur #mul #accident

मूल:- तालुक्यातील चांदापूर फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली असून, आठ ते दहा प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Truck and bus accident in Chandrapur district)

मूलवरून एमएच ४०-९३१८ क्रमांकाची बस प्रवाशी घेऊन चामोर्शीकडे जात होती. चांदापूर फाट्याजवळ बस येताच खेडी मार्गावरून भरधाव येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. व अपघातात बसमधील आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, काही प्रवाश्यांच्या डोक्याला मार लागला आहे. जखमी झालेल्या प्रवाश्यांवर मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत