सेट परीक्षेत भौतिकशास्त्रात सौरभने मारली बाजी.


राजुरा:- राजुरा येथिल काँग्रेस पक्षाचे नेते साईनाथ बतकमवार ह्यांचे सुपुत्र, प्रज्ञावंत विद्यार्थी सौरभ बतकमवार ह्यांनी प्राध्यापक पदासाठी पात्रतेचा निकष असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सेट परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र शासनाने 26 मार्च 2023 रोजी सेट परीक्षेचे आयोजन केले होते. ह्या परीक्षेत सौरभने भौतिकशास्त्र विषय घेऊन परिक्षा दिली. 27 जुन रोजी जाहिर करण्यात आलेल्या निकालानुसार त्याने 150 गुण प्राप्त करून भविष्यातील विद्यार्थी घडविण्याच्या मार्ग मोकळा केला आहे.

सौरभने आपले शालेय शिक्षण शहरातील इन्फंट जिजस कॉन्व्हेन्ट मधुन पुर्ण केले, दहाव्या वर्गात 95% गुण घेऊन त्याने आपली चुणुक दाखवून दिली होती. उच्च माध्यमिक व पदवी अभ्यासक्रम शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातून तर भौतिक शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चंद्रपूर येथिल सरदार पटेल महाविद्यालयातून उत्तम गुणांनी पुर्ण केला असुन सध्या तो गोंडवाना विद्यापीठातून भौतिकशस्त्रातील आचार्य पदवी (PHD) पुर्ण करीत आहे..

भौतिकशास्त्र विषय घेऊन बऱ्याच कालावधीनंतर राजुरा तालुक्यातून सेट परीक्षा उत्तीर्ण करणारा विद्यार्थी ठरल्याबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ऍड. संजय धोटे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजप महामंत्री दिलीप वांढरे, वामन तुराणकर यांनी प्रत्यक्षात भेटून सौरभचे पुष्पगुच्छ देऊन गौरव केले व परिवाराला शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या