Top News

"पावसा थेंब थेंब गळ" "Rain Drops Drops"

(भद्रावती येथील सुप्रसिद्ध कवी अरुण घोरपडे यांनी आपल्या कवितेतून मांडल्या शेतकऱ्याच्या व्यथा)

❤️
पावसा थेंब थेंब गळ...
पावसा थेंब थेंब गळ... || धृ ||

पाण्याविना मासा जगलं रे कसा..
हाक बेडकाची कोरडा रे घसा...
उन्हाळ्यात त्याचं अटलं रे तळ...
पावसा थेंब थेंब गळ...
पावसा थेंब थेंब गळ...|| 1 ||

शेतामध्ये बळीन पेरलं बियाणं...
आस तुझी त्याले तू वेळेवर येणं..
नभाकडे पाहून त्याला येतो रळ...
पावसा थेंब थेंब गळ...
पावसा थेंब थेंब गळ....|| 2 ||

वाऱ्या तू ढगाले शेतात फिरव...
पावसाचं पाणी मातीत जिरव...
बियाले उगवासाठी देजो तू रे बळ...
पावसा थेंब थेंब गळ...
पावसा थेंब थेंब गळ...|| 3 ||

सांग तूझ्या ढगाले पाडू नको विजा..
नको पुन्हा पूर, नको पुन्हा इजा...
रिमझिम बरस तू नको लावू झळ....
पावसा थेंब थेंब गळ...
पावसा थेंब थेंब गळ....|| 4 ||

काम तुझे मोठे आहे तू महान..
तुझ्यामुळे भागते सृष्टीची तहान..
धरनीमायेची भर तू ओंजळ..
पावसा थेंब थेंब गळ....
पावसा थेंब थेंब गळ....|| 5 ||


▪️कवी अरुण घोरपडे
 मो.9657041041

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने