चंद्रपूर जिल्ह्यात कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघात #chandrapur #nagbeed #accident

नागभीड:- नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक सहाही नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतकांमध्ये रोहन विजय राऊत (वय 30, नागपूर), ऋषिकेश विजय राऊत (वय 28), गीता विजय राऊत (वय 50), सुनीता रुपेश फेंडर (वय 40, नागपूर), प्रभा शेखर सोनवणे (वय 35, रा.लाखनी जि. भंडारा), यामिनि फेंडर (वय 9, रा. नागपूर) यांचा समावेश आहे.


कारमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी पोहोचले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत