Top News

कुडेसावली आश्रमशाळेतील ११४ विद्यार्थ्यांची नावे दुसऱ्या शाळेत chandrapur pombhurna


संस्थेनी शासनाची केली आर्थिक फसवणूक

शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, देवाडा खुर्द अंतर्गत कुडेसावली आश्रमशाळेतील बोगस विद्यार्थी गैरप्रकार

पोंभूर्णा:- तालुक्यातील देवाडा खुर्द येथील शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने कुडेसावली येथे अनुदानीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा सुरू आहे. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांनी जिल्ह्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळेतील सरळ प्रणालीला आधार कार्ड अपडेट नसणाऱ्या सर्व यादी सादर करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. (Names of 114 students of Kudesavali Ashram School in another school)

माहिती सादर केली असता कुडेसावली येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षण घेणाऱ्या ११४ विद्यार्थ्यांची नावे दोन शाळेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. तपासणी केली असता संबंधित विद्यार्थ्यांचे नाव दुसऱ्या शाळेत आढळून आले. यातून संस्थाचालकांनी आदिवासी विभागाची दिशाभूल करून फसवणूक व आर्थिक लुट केली आहे.

जिल्ह्यात एकूण अनुदानित २५ आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये ७ हजार ७५५ विद्यार्थी निवासी व अनिवासी ८४८ विद्यार्थी शिक्षण घेतात. सध्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची मोहीम सुरू आहे. सरळ प्रणालीला आधार कार्ड अपडेट नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव शोधणाऱ्या या मोहिमेत कुडेसावली येथील अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती तपासणी करीत असतांना या शाळेतील ११४ विद्यार्थी बोगस आढळून आले असून. या ११४ विद्यार्थ्यांचे नाव दुसऱ्या आश्रमशाळेत आढळून आले.

ज्या विद्यार्थ्यांची नावे आधार कार्डवरून दोन शाळेत आढळली. अशा विद्यार्थ्यांची नावे एका शाळेतून डिलीट करण्यात येईल. मात्र संस्थाचालकांनी अनेक वर्षांपासून बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक केली आहे. तो अनुदान कोण वापस करणार? हा प्रश्न समोर येत आहे. अनुदानीत आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यामागे शासन १,५०० रुपये महिन्याचे अनुदान देते. तर वार्षिक १८,००० रुपये इतका अनुदान एका विद्यार्थ्यामागे आहे. कुडेसावली आश्रमशाळेत २८३ विद्यार्थ्यांची पटसंख्या दाखवून अनुदान संस्थेनी लाटलेले आहे. यातील ११४ विद्यार्थांचे नाव हे दुसऱ्या आश्रमशाळेत आहेत तर ६३ विद्यार्थांचे आधार कार्ड अपडेटच नाहीत. संस्थेने ११४ बोगस विद्यार्थामागे वर्षाचे २० लाख ५२ हजार रुपयाचे आर्थिक अनुदान शासनाला फसवून लाटलेले आहे. आदिवासी आश्रमशाळा व आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावाखाली शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ देवाडा खुर्द‌‌‌ यांनी बोगस विद्यार्थी दाखवून जी लाखो रुपयाची शासनाची फसवणूक केली आहे. सदर अनुदानाची रक्कम प्रशासन कसे वापस घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. संस्थेनी किती वर्षांपासून बोगस विद्यार्थी दाखवून अनुदान लाटले आहे याची सखोल चौकशी करण्याची मागणीही यातून पुढे येत आहे.

शिवाजी ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ देवाडा खुर्द‌‌‌ अंतर्गत अनुदानीत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कुडेसावली येथे अनेक वर्षांपासून बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे.या शाळेत मोठा गैरप्रकार झालेला असून आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेची सखोल चौकशी करून संस्थाचालकावर कार्यवाही करण्यात यावी.
रंजीत गेडाम, आदिवासी कार्यकर्ता,जामखुर्द

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने