घात कि अपघात? कारण मात्र गुलदस्त्यात
चंद्रपूर:- प्रहारचे रुग्णसेवक जीवन तोगरे यांच्या संशयास्पद मृत्यूने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिवती तालुक्यातील पाटागुडा येथिल रहिवासी प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांच संशयास्पद मृत्यू झाला आहे.
आज दि.04/05/2023 सकाळी 9.00 वा च्या सुमारास मरकागोंदी रोडच्या बाजूला जीवन यांचा मृतदेह मृत्यु अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली. जिवन तोगरे हे सामाजिक कार्यासोबतच पत्रकार होते. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व शवविच्छेदन सुरू आहे. परंतु रुग्णसेवक जीवन तोगरे यांचा संशयास्पद मृत्यूमुळे घात कि अपघात? हे अद्याप कळू शकले नाही. कारण मात्र गुलदस्त्यात असल्याने पुढील तपास पोलीस करीत आहेत.