मालगाडीच्या दोन बोगी रुळावरुन घसरल्या #chandrapur #nagpur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या अचानक दोन बोगी रुळावरुन घसरल्या. ही मालगाडी वर्धा रेल्वेस्थानकावर पोहोचताच ही घटना घडल्याने घसरलेल्या बोगी सुमारे २०० फूट सिमेंटच्या स्लिपरवरुन घसरत गेले.

त्यामुळे स्लिपरचे नुकसान झाले असून मालगाडी थांबल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार ५८ बोगी असलेली मालगाडी सिमेंटच्या गोण्या घेऊन चंद्रपूर येथून जळगावला जात होती. ही मालगाडी साडेचार वाजतादरम्यान वर्धा रेल्वेस्थानकाच्या मालधक्क्यावर पोहोचली. नवीन फुटब्रिजजवळ इंजिन पोहोचल्यानंतर अचानक दोन बोग्यांची चाके रुळावरुन घसरली. त्याच अवस्थेत मालगाडी पुढे सरकत होती. मालगाडीची रुळावरून घसरलेली चाके जवळपास २०० फूट पुढे जात होती. तेव्हा ही बाब लक्षात येताच धावपळ उडाली. तेवढ्यात ही मालगाडी थांबल्याने पुढील अनर्थ टळला. पॉवर इंजिनमधील बोगी क्रमांक १३ आणि ३१ याच घसरल्या असून मालगाडीच्या एका बोगीत १ हजार सिमेंटच्या गोण्या असतात. या मालगाडीच्या २९ बोग्या नांदगाव आणि २९ बोग्या जळगाव येथे खाली करायच्या होत्या. मालगाडी रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच वर्धा स्थानकाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. ही मालगाडी मालधक्का फलाटावर असल्याने कोणत्याही रेल्वेगाड्या प्रभावित झाल्या नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)