वेगवेगळ्या घटनेत दोघांची रेल्वेखाली आत्महत्या #chandrapur

चंद्रपूर:- दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. पहिल्या घटनेत भद्रावती तालुक्यातील ऊर्जाग्राम व विजासन या दोन रेल्वे लाईनवर रेल्वे खाली उडी घेऊन महेश विजय जुनघरे (४७) रा. कुटाळा याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

दुसऱ्या घटनेत शुक्रवारी गजानन बबन गाताडे (४८) रा. विजासन नेताजी वार्ड याने विजासन परिसरातील रेल्वे लाईनवर आत्महत्या केली. गजानन गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होता. या दोन्ही घटनांचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस शिपाई विजय नागपूरकर करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत