चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने केली बायकोची कुऱ्हाडीने निघृण हत्या #chandrapur #pombhurna #murder

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- तालुक्यातील उमरी पोतदार पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगर हळदी (माल) येथे दि. ६ जून मंगळवारला पहाटे ३ वाजताच्या सुमारास नवऱ्याने बायकोच्या चरित्र्यावर संशय घेवून झोपेत असलेल्या बायकोच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. तर झोपेत असलेल्या दोन मुलीवरही त्याने कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले आहे. आशा मनोज लेनगुरे वय (३५) वर्ष असे मृतक पत्नीचे नाव असून जखमी मुलींमध्ये अंजली मनोज लेनगुरे वय (१७) वर्ष,पुनम मनोज लेनगुरे वय(१४) वर्ष असे जखमी मुलींचे नाव आहे.


पोंभूर्णा तालुक्यातील डोंगर हळदी माल येथील मनोज लेनगुरे हा आपल्या पत्नीवर नेहमीच चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांमध्ये नेहमीच भांडण व्हायचे. मंगळवारला रात्रो ३ वाजताच्या दरम्यान आरोपी मनोज लेनगुरे यांनी घराच्या स्लॅपवर आपल्या दोन मुलींसह गाढ झोपेत असलेल्या पत्नी आशाच्या डोक्यात धारधार कुऱ्हाडीने वार करून ठार मारले. तर मोठी मुलगी अंजली व लहान मुलगी पुनम ह्याच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. यात दोन्ही मुली गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही मुलींवर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर आहे.

आरोपी मनोज लेनगुरे वय (४०) वर्ष याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कलम ३०२,३०७,३२४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उमरी पोतदार पोलिस स्टेशचे ठाणेदार किशोर शेरकी करीत आहेत.
घटनास्थळी दाखल

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनी भेट दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा पथक, फारेंसीक टिम घटनास्थळी दाखल झाली.