पोंभूर्णा:- बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उमरी पोतदार बीट २ मधील असलेली रोपवाटीका भर उन्हाळ्यात हिरवीगार रोपट्याने बहरून आली आहे. रोपवाटीकेत विविध प्रजातीची रोपे तयार करण्यात आली आहेत. बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील बराच मोठा भाग या रोपवाटीकेतील झाडांमुळे हिरवेगार होण्यासाठी मदत होणार आहे. यातच रोपवाटीका स्थानिक महिलांना आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी सहकार्य करीत आहे. या रोपवाटीकेत तब्बल बेचाळीस महिला व बारा पुरूष या रोपवाटीकेत काम करीत आहेत.
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील उमरी पोतदार बिट २ मध्ये वनविगाने रोपवाटीका तयार केली आहे. भर उन्हाळ्यात पाणी टंचाई असतांना सुद्धा सुयोग्य नियोजन करून वनविभागाने रोपवाटिका फुलवली आहे.जंगल वाढीसाठी, हिरवाई फुलवण्यासाठी वन विभागाने प्रयत्न केले आहे. नुकताच रोपवाटीकेत सौर ऊर्जा वर चालणारी बोअरवेल बसवून पाण्याची समस्या दुर केल्या गेली आहे.
रोपवाटीकेत ५४ मजुरांच्या साह्याने एक लाख पिशवीत माती भरून चिंच, शिसव, चिचवा, करंज, शिवण, सिताफळ, कवट, मोह, किन्ही, आपटा, कडुनिंब, महागुनी, शिरस, रेन ट्री, सिंदुरिया, फणस, आंबा, जांभूळ एवढ्या प्रजातीची रोपे लावलेली आहे. ५० हजार झाडे तयार झाले असून ५० हजार झाडे तयार केली जात आहेत.पावसाचे आगमण होताच झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
रोपवाटिकेत एक लाख रोपे तयार केली जात आहेत यासाठी ५४ मजूर काम करीत असून यात ४२ स्थानिक महिलांना रोजगार मिळाला असून आर्थिक मोबदला मिळत असल्याने ते स्वावलंबी बनून जगत आहेत. मजूरीपोटी त्यांना २७३ रूपये मिळतात. हि रोपवाटीका ९ महिणे कालावधीत तयार करण्यात येते.
रोपवाटिकेत ५० हजार रोपटे तयार झाले असून ५० हजार रोपटे तयार करण्यात येत आहेत. रोपवाटीकेत दुर्मिळ झाडांची रोपटे तयार करण्यात आली आहेत यात सिंदुरीया, महागुणी, रेन ट्री हि काही महत्त्वाची रोपटे तयार करण्यात आले आहेत.
सुरेंद्रकुमार देशमुख, वनरक्षक उमरी
उमरी पोतदार येथे एक लाख रोपट्याची क्षमता असलेल्या रोपवाटीकेत विविध प्रजातीची रोपे तयार केली असून भर उन्हाळ्यात सुयोग्य नियोजनाने ही रोपे हिरवीकंच झाली आहेत. या रोपवाटिकेतून महिलांनाही रोजगार देण्याचे वनविगाने प्रयत्न केले आहे. पावसाचे आगमन होताच या रोपट्यांची लागवड केली जाणार आहे.
नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत