बापरे! धावत्या दुचाकीचा टायर फुटल्याने‌ दुचाकीस्वाराचा मृत्यू #chandrapur #accident

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) शार्दुल पचारे, चिमूर 
चिमूर:- धावत्या दुचाकीचा अचानक टायर फुटल्याने दुचाकी पडून काही अंतरापर्यंत घसरत गेली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोनेगाव (सिरास) बायपासवरील पोल्ट्री फॉर्मजवळ शनिवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

अमित विजय पाचभाई (२०) रा. मांगलगाव असे मृतक युवकाचे नाव असून, तो वरोरा येथील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. तो शनिवारी चिमूरच्या सोनेगाव (सिरास 1) कडील बायपासमार्गे दुचाकीने आपल्या मित्रासोबत जात होता. दुचाकीचा टायर फुटल्याने दुचाकी खाली पडून घसरत गेली. यात अमित पाचभाई गंभीर जखमी झाला. त्याला लगेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.