दिनांक ०८ जुन रोज गुरुवार ला छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणुक व पालखी सोहळा काढण्यात आला त्यानंतर दोन दिवसीय कार्यक्रम व भव्य पुस्तकांच्या प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते मा. श्री. आशिष देवतळे ( जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सौ अभिलाषा गावतुरे, प्रमुख उपस्थिती मा. श्री. विजय चिताडे, मा. श्री. उमेश आष्टनकर, मा. सौ. योगिता भोंगाडे मंचावर उपस्थित होते. तसेच सायंकाळी समाज प्रबोधन कीर्तनाचा कार्यक्रम, राष्ट्रीय प्रबोधनकार कु. साक्षी अतकरे ( राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानित) यांच्या मार्गदर्शनात कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.
दिनांक ०९ जुन २०२३ रोज शुक्रवार ला शिवव्याख्यान व बक्षीस वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला, या कार्यक्रमा मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आ. किशोर जोरगेवार ( आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र), विशेष उपस्थिती तसेच शिवव्याख्याते मा. श्री. आकाश भोंडवे पाटील ( विद्यापीठ संस्थापक, श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालय), प्रमुख अतिथी मा. श्री सुभाष कासनगोट्टवार ( माजी नगरसेवक तुकुम), मा. श्री. ब्रिजभुषण पाझारे ( महामंत्री भाजपा चंद्रपूर), मा. श्री. रमेश भुते ( सचिव, चांदा जिल्हा संताजी शिक्षणं प्रसारक मंडळ चंद्रपूर), मा. श्री. अजय वैरागडे ( माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना), मा. श्री. सचिन भोयर ( माजी नगरसेवक मनसे चंद्रपूर), मा. श्री उमेश आष्टनकर ( सचिव, भाजपा महानगर चंद्रपूर), मा. श्री. विजय पोहनकर, मा. श्री. पंकज गुप्ता मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, निशिकांत आष्टनकर यांनी मांडले तसेच शिवव्याख्याते आकाश दादा भोंडवे पाटील यांनी शिव्याख्यान च्या माध्यमातून उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातुन घेतलेल्या विवीध स्पर्धेचे बक्षीस वितरण व पालखी सोहळा मध्ये उपस्थित चंद्रपूर जिल्ह्यातल्या सर्व भजन मंडळांना उपस्थित पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक निशिकांत उमेश आष्टनकर (जिल्हाध्यक्ष), काजल पाऊणकर (युवती प्रमुख), प्रगती मार्कडवर (कार्याध्यक्ष), सुनयना रोहनकर (सचिव), प्रतीक धुंडे (सहसचिव) आदींची उपस्थिती होती. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर मेश्राम यांनी केले तर आभार अश्विनी नन्नावरे यांनी मानले.