वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा #chandrapur

पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश
चंद्रपुर:- जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्‍यक्ष मोक्‍यावर पंचनामे करून तात्काळ आपद‌्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. (Make an immediate Panchnama of the damage caused to the citizens due to the storm)

या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी, नागरिक यांच्या पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. यांसदर्भात नुकसानीचे सर्व्हेक्षण करून पंचनामे करावे व नुकसान भरपाई तात्काळ अदा करण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवार दिनांक ११ जून २०२३ रोजी तातडीने चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. (Guardian Minister Sudhir Mungantiwar's instructions to Collector)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत