बस स्थानकातून दोन लाखांच्या सोन्यासह आठ हजाराची चोरी #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0

राजुरा:- येथील बस स्थानकातून एका महिला प्रवाशाची बॅग चोरट्यांनी लंपास करून तब्बल दोन लाख रुपयांचे सोने तसेच आठ हजार रुपयांवर डल्ला मारला. ही घटना मंगळवारी घडली. महिलेच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी कांता अनिल मालेकर यांची प्रकृती बरोबर नसल्याने चंद्रपूर येथे रुग्णालयात तपासणीसाठी जात होत्या. दरम्यान, घरी चोरीच्या भीतीने त्यांनी चंद्रपूर येथील मुलीकडे सोने ठेवण्यासाठी सोबत घेतले होते. पर्समध्ये सोने तसेच आठ हजार रक्कम घेऊन चंद्रपूर येथे जाण्यासाठी त्या राजुरा बसस्थानकात आल्या. येथे बस येताच मोठी गर्दी झाली. यानंतर त्या बसने चंद्रपूरला गेल्या. मात्र तेथे जाताच पर्समधील सोने व रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यानंतर त्यांनी राजुरा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार दीड तोळ्याचा गोफ, सव्वा तोळ्याची पोत असे एकूण पाऊणे तीन तोळे सोने आणि आठ हजार रूपयांची नगदी रक्कम चोरीला गेली. यासंदर्भात राजुरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)