मान्सूनने यंदा त्याचा मार्ग बदलला; विदर्भात प्रवेशासाठी निवडला "वाघांचा जिल्हा" #chandrapur


चंद्रपूर:- तळकोकणात रखडलेला मान्सून आता लवकरच राज्य व्यापणार असल्याची नांदी भारतीय हवामान खात्याने दिली. विदर्भात पावसाचा सुरुवात झाली आहे. पण यंदा त्याने मार्ग बदलला. विदर्भातील प्रवेशासाठी त्याने वाघांचा जिल्हा म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्याची निवड केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आता मार्ग मोकळा झाला आहे. त्याच्या आगमनात अडसर ठरणारे “बिपरजॉय” चक्रीवादळदेखील पुढे सरकले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी बरसल्या. चक्रीवादळामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग काही काळासाठी मंदावला. तर दुसरीकडे पूर्वेकडील वाऱ्यांची गती नियमित असल्यामुळे यंदा मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात प्रवेश करणार होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत