Click Here...👇👇👇

वाघाच्या कातडीची तस्करी; दोन आरोपी ताब्यात #chandrapur

Bhairav Diwase


चंद्रपूर:- वाघाच्या कातडीची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती नागपूर वनविभागास मिळाली. त्या माहितीच्या आधारे विशेष पथक तयार करून भंडारा विभागाच्या पथकासह संयुक्त कार्यवाही करून वाघाच्या कातडीसह २ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.

सविस्तर माहिती अशी की, पवनी येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार आहे, अशी माहिती वन विभागाला मागील काही महिन्यांपूर्वी मिळाली होती. त्यावर वन विभाग नजर ठेवून होते. सकाळी पवनी वनपरिक्षेत्रात सापळा रचून तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी निलेश सुधाकर गुजराथी (रा. चंद्रपूर वय ३३), विकास बाथोली बाथो (रा. चंद्रपूर, वय ३१) यांना वाघाची कातडी आणि दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध विविध कलामांद्वारे वन गुन्हा नोदविण्यात येणार आहे.

ही कारवाई मुख्य वनसंरक्षक (प्रा)रमेश कुमार, उपवनसंरक्षक नागपूर भारत सिंह हांडा, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात विभागीय वन अधिकारी (दक्षता) पी. जी. कोडापे, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा) पवनी हिरालाल बारसगडे, वन परिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी प्रमोद वाडे, निलेश तवले, दिनेश पडवळ, आर.एस. पोरेते, थुले, वासनिक सर्व वनरक्षक आणि भंडारा वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केली. पुढील तपास वाय. व्ही. नगुलवर करीत आहेत.