Click Here...👇👇👇

सिंगडझरीत पुरस्कृत महिलांना मिळालेच नाही सन्मानचिन्ह #chandrapur #sindewahi

Bhairav Diwase

आदिवासी महिला असल्याने भेदभाव तर नाही ना?

सिंदेवाही:- तालुक्यातील सिंगडझरी ही गट ग्राम पंचायत आहे.यामध्ये वन्यक्षेत्रात वास्तव असणारे गाव म्हणजे पिपरहेटी,पांढरवानी येतात.या गावात प्रामुख्याने आदिवासी लोक आपलं वास्तव्य करतात.हे विशेष आहे.महाराष्ट्र राज्य शासनाने अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीचे औचित्य साधून महिला बालविकास ग्रा.पं.क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या महिलांना अधिक चांगले काम करण्यांची प्रेरणा मिळावी.म्हणून राज्य शासनाने या दिवशी प्रत्येक ग्रा.पं.मध्ये दोन महिलांची निवड करून पुरस्कृत करायचे आदेशीत केले.हा शासनाचा उद्देश कौतुकास्पद होता.मात्र या पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यासाठी ग्रा.पं.ने गावातील नागरिकांना पूर्व सूचना किंवा नोटीस कुठंच लावले नाहीत.त्यामुळे हा लंपडावं खेळ खेळल्या सारखंच दृश्य निर्माण झालं आहे.तेव्हा ग्रा.पं. कार्यालय सिंगडझरी येथे सुद्धा १)निराशा कुशाब लाजेवार २) मिना सुखदेव उईके यांना सन्मानीत करण्यात आले.पण सिंगडझरी ग्रा.पं.क्षेत्रातील संधी साधू पुढाऱ्यांनी याचा गैरफायदा घेत पुरस्कृत महिलांना सन्मान चिन्हच दिल नाही.अर्थातच शासनाच्या आदेशाचा अवमान केल्याचा प्रकार याठिकाणी घडला आहे.तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी याची पुरेपूर चौकशी करून संबधितावर कारवाई करण्यांची मागणी जोर धरत आहे.