प्रा. शरद नागनाथराव लखेकर यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान

Bhairav Diwase
0


गोंडपिपरी:- यशवंत महाविद्यालय नांदेड येथील संशोधक विद्यार्थी व चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायन्स, गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. शरद नागनाथराव लखेकर यांना नुकतीच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कडून रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.  दिनांक 30 मे 2023 रोजी ऑनलाईन पद्धतीने पीएचडी ची मुलाखत घेण्यात आली. 

या मुलाखती साठी  विद्यापीठा चे स्कूल ऑफ केमिकल सायन्स चे संचालक डॉ. संतोष देवसरकर, डीन डॉ. एल. यम. वाघमारे, विज्ञान आणी तंत्रज्ञान, बहिस्थ परीक्षक डॉ. नीरेन कठाळे, सरदार पटेल कॉलेज, चंद्रपूर, मार्गदर्शक डॉ. एम.ए. बसीर व रसायनशास्त्र विभाग, यशवंत कॉलेज आणी सायन्स कॉलेज नांदेड येथील सर्व प्राध्यापक, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. सिंथेसिस, कॅरेक्टराईजेशन, स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप स्टडीज ऑफ न्यू थायएझोलीडायनोन, पीरिडीन, पायऱ्याझोलीन अँड पिरीमिडीन या विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला आहे. त्यांना यशवंत कॉलेज नांदेड येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉक्टर एम.ए. बशीर यांचे खूप चांगले मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल त्यांचा  यशवंत कॉलेज चे प्राचार्य डॉ. जी.एन. शिंदे, रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. आर. कळंबकर व सर्व प्राध्यापक,  चिंतामणी कॉलेज, गोंडपिपरी येथील प्राचार्य डॉ. आशिष चव्हाण व सर्व प्राध्यापक मित्र परिवाराकडून सत्कार व अभिनंदन करण्यात आला. 
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)